पोस्ट्स

वामन हरी वाटमारे

इमेज
वामन हरी वाटमारे      फार फार वर्षंपूर्वीची गोष्ट आहे ही, एक कोकणातील गाव आहे, गावाचे नाव आहे ताम्हणकर वाडी, निसर्गरम्य गाव चारही बाजूंनी उंच डोंगर, आणि डोंगराच्या मध्ये खाडी तिचा उगम खारेपाटण या गावातून झाला आणि शेवट विजयदुर्गला झाला. शेवट झाला म्हणण्या पेक्षा अरबी समुद्राला जाऊन  मिळाली.       ताम्हणकर वाडी हे सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी कुशीत वसलेले आहे, गावच्या वेशीला लागूनच खाडी असल्याने या गावाला एक वेगळेच महत्त्व आले आले. खाडीतील ताजे मासे रोज इथल्या गावकऱ्यांना खायला मिळतात. नारळी पोपळीची  झाडे सुध्दा आहेत, शिवाय हापूस आंब्याच्या बागायती पुष्कळ आहेत येथे या गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी जोडधंदा म्हणजे आंब्याचा व्यापार , म्हणजे मोठं मोठे बागाईत दार तर आहेतच येथे, पण छोटे छोटे बागायत दार सुध्दा आहेत. असो.     ताम्हणकर वाडी या  गावात दयाळ आणि दमयंती नावाचे जोडपे राहत होते. लग्न होऊन फार दिवस झाले नसल्याने त्यांना  मूलबाळ इतक्या लवकर होण्याची शक्यता नव्हती. दयाळ हा दिसायला फार सुंदर नसला तरी देखणा हो...